बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी नोकरीचे अमिष दाखवून लैगिक अत्याचार केल्याच्या आरोपाबरोबरच एक सेक्स सीडी देखील व्हायरल झाली होती. यांनतर जारकिहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी नवीन नवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान व्हिडिओत दिसलेल्या महिलेच्या कुटूंबाने तक्रार दिली आहे की, मुलीला बेंगळूर येथे अज्ञात लोकांनी अपहरण केले आहे. या दाव्याचा तपास करण्यासाठी बेळगाव पोलिसांनी बुधवारी एक विशेष पथक नेमले आहे.
बेळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी शहरातील एपीएमसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम २६३, ३६८, ३४३, ३४६, ३५४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक टेलिव्हिजन वाहिन्यांवरून प्रसारित झालेल्या व्हिडिओमधील महिलेच्या पालकांनी सांगितले की त्यांच्या मुलीचा जीव धोक्यात आहे आणि त्यांना तिचा शोध घेता आला नाही. ” असे म्हंटले आहे. तसेच तिच्या मुलीने त्यांच्याशी संपर्क साधू नका असे सांगितले. “त्यानंतर तिचा फोन बंद झाला असल्याने आम्ही बेळगावमध्ये हरवल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला,” असे तिच्या आईने म्हंटले आहे.
पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. विक्रम अमथे यांनी पुष्टी केली की या अपहाराच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त (बाजार उपविभाग) यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक एकत्रित ठेवण्यात आले आहे.
“एपीएमसी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे. स्थानिक पोलीस कुटूंबाला संरक्षण पुरवायचे की नाही याबाबत त्यांनी विचारणा करावी, “असे पोलीस उपायुक्त म्हणाले.









