ऑनलाईन टीम / टोकियो :
ऑलिम्पिक 2020 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघांना कांस्यपदकाच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी झालेल्या लढतीत ग्रेट ब्रिटनने त्यांचा 4-3 असा पराभव केला.
याआधी भारतीय हॉकी संघाने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा महिला संघाने चौथा क्रमांक पटकावला होता. कालच भारताच्या पुरुष हॉकी संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. पुरुष संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते.
पहिल्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघ बॅकफूटवर दिसत होता. या क्वॉर्टरमध्ये भारताने गोल केला नसला तरी भारताची गोलकीपर सविताने 4 गोल सेव्ह केले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने पुन्हा एकदा गोल करून आघाडी 2-0 अशी केली. भारती संघ अडचणीत दिसत असताना 25 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरने भारताने पहिला गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला गुरजीतने पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करून बरोबरी केली.
दुसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना भारताच्या वंदना कटारियाने तिसरा गोल करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. 2-0 ने पिछाडीवर असलेल्या भारताने आता 3-2 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या हाफचा खेळ संपला तेव्हा भारताकडे 3-2 अशी महत्त्वाची आघाडी होती.
- पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला मोदींचा खास संदेश, म्हणाले…
We will always remember the great performance of our Women’s Hockey Team at #Tokyo2020. They gave their best throughout. Each and every member of the team is blessed with remarkable courage, skill and resilience. India is proud of this outstanding team.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, ‘मुलींच्या कामगिरीने नव्या भारताची भावना प्रदर्शित केली आहे. या महान कामगिरीची आम्हाला नेहमी आठवण राहील.’