ऑनलाईन टीम / लखनऊ :
महिला सुरक्षेबाबत योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार युपी सरकार 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान, एक अभियान सुरू करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात अप्पर मुख्य सचिव अविनाश कुमार अवस्थी यांनी शनिवारी बैठक घेतली.

अवस्थी म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी एक अभियान चालवण्याचे आदेश दिले आहेत. हे अभियान पोलीस आणि शिक्षण विभागाच्या मदतीने चालवले जाणार आहे. या अभियानाची संपूर्ण कार्य योजना लवकरच समोर येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे सरकारवर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे. हाथरस प्रकरण आणि त्यानंतर बलरामपुर मधील बलात्काराची घटना यामुळे सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे आता अशा घटना रोखण्यासाठी सरकारकडून कडक पावले उचलली जात आहे.









