प्रतिनिधी / कुर्डुवाडी
रोपळे गावात लस मिळाली नाही तर तुम्हाला इथे नोकरीस राहू देणार नाही. तुम्हाला डोके नाही तुम्ही राजीनामा द्या अशा प्रकारे महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवर व समक्ष धमक्या देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी तात्यासाहेब गोडगे रा.रोपळे यांच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी दि.२६ एप्रिल रोजी लसीकरणाचे काम चालू असताना रोपळे येथील सरपंच वैशाली गोडगे यांचे पती तात्यासाहेब गोडगे हे त्यांच्या मित्राला रांगेतून नंबर न लावता आतमध्ये घेऊन आले.त्यावेळी फिर्यादी डाॅ.राखी भंडारे यांनी नंबरने या असे सांगितले असता गोडगे म्हणाले आम्ही असेच येणार ,तुम्ही बोलायचे काम नाही आमच्या लोकांना लस नाही दिली तर मी तुम्हाला गावात राहू देणार नाही तुमची बदली करुन टाकीन. गावातून बेइज्जत करुन हाकलून देईन असे म्हणत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
तसेच दि.२७ मे रोजी मला फोनवरून रोपळे गावाला लस का नाही.कधी देणार असे विचारले असता मी फोन बंद केला. तात्यासाहेब गोडगे नेहमी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन मला म्हणतात की लस द्यायलाच पाहिजे.नाही दिली तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. तुम्ही लस नाही दिली तर तुम्हाला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. ते ज्या ज्या वेळी ते प्राथमिक आरोग्य केंद्रात येत त्यावेळी ते रोपळे गावात लस मिळाली नाही तर तुम्हाला इथे नोकरीवर राहू देणार नाही अशा प्रकारे धमक्या देतात म्हणून डॉ.राखी भंडारे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र रोपळे यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून तात्यासाहेब गोडगे यांच्याविरूद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









