बेळगाव : महिला विद्यालय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा पार पडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अनंत भिकाजी गोरे, दक्षा गोरे, महिला विद्यालय मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शोभा शानभाग, शाळेची माजी विद्यार्थिनी स्नेहा पुजारी, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील उपस्थित होते. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. यावेळी इ. 6 वी ते 9 पर्यंतच्या प्रथम आलेल्या तसेच दहावीच्या 2020 परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला बेंगळूरस्थित सखाराम आठवले यांनी लॅपटॉप देऊन गौरव केला. तसेच द्वितीय, तृतीय आलेल्या व विविध विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थिनींना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गेली अनेक वर्षे चालत आलेली परंपरा यंदाही कायम ठेवत होतकरू विद्यार्थिनींना गणवेश तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 2010 ची माजी विद्यार्थिनी सीए स्नेहा पुजारी हिने विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ हे पुस्तक भेट देत विद्यार्थिनींना कष्ट करण्याचा मूलमंत्र सांगितला. प्रास्ताविक व आभार ए. ए. देशपांडे यांनी केले. पारितोषिक वितरणाचे निवेदन स्मिता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम आयोजित करण्यास मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









