दापोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल
प्रतिनिधी / दापोली :
दापोली तालुक्यातील एका प्रथितयश जेष्ठ महिला कायदेतज्ञ असणाऱ्या वकिलांच्या नावाने फेक फेसबुक खाते निर्माण करून त्याद्वारे पैशांची मागणी करत असल्याचे तक्रार दापोली पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यामध्ये 31 वर्ष वकिली करणाऱ्या एका महिला वकिलाच्या नावाने अज्ञात इसमाने फेक खाते सुरू केले आहे. याकरिता या महिला वकिलांचा फेसबुक वरील फोटो देखील वापरला आहे. हे खोटे खाते तयार केल्यानंतर या खात्यातून त्यांच्या परिचितांना या अज्ञात भामट्याने फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठवल्या. ज्यांनी या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्या त्यांना या भामट्याने मला पैशांची गरज आहे तरी आपण मला गुगल पे च्या 9394254405 या नंबरवर 25000 रुपये पाठवावे अशा पोस्ट टाकल्या. यातील एकाने थेट वकील महिलेशी संपर्क साधला असता हा बनाव उघडकीस आला.









