प्रा. मनीषा नेसरकर यांचे मत
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला या कुटुंबाचा कणा आहेत. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी महिलांचे योगदान मोलाचे आहे. महिलांनी समाज विघातक गोष्टिंपासून दूर राहून कुटुंबाची प्रगती साधली पाहिजे, असे मत प्रा. मनीषा नेसरकर यांनी व्यक्त केले.
कंग्राळी खुर्द येथे जनलोक सेवा सोसायटी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मुलांना घडविण्याची जबाबदारी महिलांची आहे. मुले अनुकरण प्रिय असतात हे महिलांनी लक्षात ठेवायला हवे. कोणत्याही मतभेदाला थारा न देता महिलांनी सकारात्मक बदल घडविण्यासाठी सक्रिय व्हावे, असे त्या म्हणाल्या.
प्रारंभी सल्लागार ऍड. सतीश बांदिवडेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सल्लागार गंगाराम कंग्राळकर यांनी सुत्रसंचालन केले. उत्तम कोकितकर यांनी आभार मानले. यावेळी सोसायटीच्या संचालक व परिसरातील महिला उपस्थित होत्या.









