वृत्तसंस्था/ वॉरसॉ
पोलंडमध्ये सुरू असलेल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रील कुस्ती स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताची विनेश फोगट हिने 53 किलो वजन गटात शुक्रवारी आपल्या दोन लढती जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
53 किलो वजन गटातील पहिल्या लढतीत विनेश फोगटने 2019 च्या विश्व कुस्ती स्पर्धेत कास्यपदक मिळविणारी इक्टेरिना पोलेश्चुकचा 6-2 अशा गुणांनी पराभव केला. त्यानंतर दुसऱया लढतीत विनेशने अमेरिकेच्या ऍमी ऍन फर्नसाईडचा केवळ 75 सेकंदात पराभव करत अंतिम फेरीकडे वाटचाल केली. 2021 च्या हंगामात विनेश फोगटने आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके मिळविली आहेत. आता ती तिसरे सुवर्णपदक मिळविण्याच्या उंबरठय़ावर आहे.









