वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची आघाडीची फ्रीस्टाईल प्रकारातील महिला मल्ल अन्शू मलिकचे लक्ष आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रतेवर राहील. पाठीला झालेल्या दुखापतीतून मलिक आता पूर्णपणे बरी झाली आहे.
19 वर्षीय मलिकला मार्चच्या पहिल्या आठवडय़ात रोममध्ये झालेल्या विश्व मानांकन कुस्ती स्पर्धेत पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे तिला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. हरियाणाच्या 19 वर्षीय मलिकला ऑलिंपिक पात्रतेसाठी 9 ते 18 एप्रिल दरम्यान कझाकस्तानमध्ये होणाऱया आशियाई ऑलिंपिक निवड चाचणी स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करावी लागेल. ऑलिंपिक पात्रतेसाठी कझाकस्तानमधील ही शेवटची चाचणी स्पर्धा आहे. 23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट मिळविण्यासाठी आपले जोरदार प्रयत्न राहतील, असे अन्शू मलिकने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









