वृत्तसंस्था/ हिस्सार
भारताची महिला मल्ल पूजा धांडा हिला कोरोनाची बाधा झाली आहे. पूजाची शुक्रवारी कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.
2018 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पूजा धांडाने रौप्यपदक पटकाविले होते. त्याचप्रमाणे या स्पर्धेनंतर काही कालावधीच्या अंतराने झालेल्या विश्व कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात पूजाने कांस्यपदक मिळविले होते. विश्व कुस्ती स्पर्धेत तब्बल सहा वर्षांनंतर पूजाने भारताला पदक मिळवून दिले होते. हरियाणातील हिस्सार येथे राहणाऱया पूजाला आता येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय इलाजासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती तिचे वडील अजमेर धांडा यांनी दिली आहे. हरियाणा क्रीडा विभागात पूजा धांडा ही कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.









