सेफ वूमन मोहिमेसाठी मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश
मुंबई / प्रतिनिधी
महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. राज्यात अशा गुह्यांना आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र सायबर, माहिती व जनसंपर्क व स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सायबर गुन्हे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिह्यात जनजागफती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला हा संदेश दिला आहे. महिलांसंदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना मदत करावी. सायबर गुह्यांचे वाढणारे प्रमाण चिंताजनक असून त्याहीपेक्षा या गुह्यांचे वारंवार बदलणारे स्वरूप जास्त गंभीर आहे. गेल्या काही काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने अशा गुह्यांना आळा घालण्याबरोबरच महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम असून यासंदर्भातील जनजागफती कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी केले आहे.