सोनी सबने ‘भावनांसह पोलीस कर्तव्य’ तत्त्वांना सादर करणारी हलकी-फुलकी मूल्याधारित मालिका ‘मॅडम सर’सह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना नाटय़मय ट्विस्ट्स व वळण पाहायला मिळणार आहेत. एसएचओ हसीना मलिकने म्हणजेच गुल्की जोशीने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे स्थिती गंभीर
होऊन जाते, ज्यामुळे कदाचित महिला पोलीस ठाणे बंद करावे लागू शकते. आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना शहरामध्ये वर्चस्व असलेल्या मास्टरजीचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. तो उत्तमरित्या स्थायिक झालेल्या मुलांचे हुंडा न घेता मुलींसोबत बळजबरीने विवाह करण्यासाठी अपहरण करतो. एका मुलीने केलेल्या तक्रारीबाबत चौकशी करताना एसएचओ हसीना मलिकला शहरामध्ये बळजबरीने होत असलेल्या विवाहांबाबत समजते आणि ती स्वतःहून या प्रकरणाचे निराकरण करण्याची जबाबदारी घेते. टीमच्या मदतीने हसीना कोणत्याही वॉरंटशिवाय मास्टरजीला अटक करते, ज्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण होतो. याबाबतचा व्हिडिओ फूटेज व्हायरल होते. या व्हिडिओमध्ये लोकांना संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एका निरागस महिलेला दुखापत होताना पाहायला मिळते आणि ते बेकायदेशीररित्या तिला मारहाण करण्यासाठी हसीनाला दोष देतात. या घटनेमुळे पोलीस विभाग हसीनाविरोधात चौकशीची जबादारी करिष्मा सिंगला देतात. चौकशीनंतर समोर येते की, हसीनाने भावनांच्या आहारी जात अयोग्य निर्णय घेतला. पुढे काय घडणार? हसीना तिची निरागसता कशाप्रकारे सिद्ध करेल आणि महिला पोलीस ठाण्याला कशाप्रकारे वाचवेल? हसीनाची भूमिका साकारणारी गुल्की जोशी म्हणाली, ‘हसीनासाठी हा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. या सिक्वेन्ससाठी शूटिंग करणे अत्यंत आव्हानात्मक होते.
काहीही घडो, हसीनाने नेहमीच योग्य निर्णय घेतला आहे. हसीना तिची निरागसता कशाप्रकारे सिद्ध करते व महिला पोलीस ठाणे बंद होण्यापासून कशाप्रकारे वाचवते हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे.‘ करिष्माची भूमिका साकारणारी युक्ती कपूर म्हणाली,
‘या केसने करिष्माला अत्यंत खडतर स्थितीमध्ये टाकले आहे. ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत योग्य निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱया हसीनाची चौकशी करत आहे. प्रेक्षकांना आगामी एपिसोड्समध्ये अनेक ट्विस्ट्स पाहायला मिळणार आहेत. करिष्मा महिला पोलीस ठाणे कशाप्रकारे वाचवते आणि आपली निरागसता कशाप्रकारे सिद्ध करते हे पाहणे रोचक असणार आहे.









