वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघाची सदस्या तसेच आंतरराष्ट्ऱीय क्रिकेटपटू प्रिया पुनिया हिच्या आईचे कोरोनाने निधन झाले आहे. इंग्लंडच्या दौऱयावर जाणाऱया भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये प्रिया पुनियाचा समावेश आहे.
काही दिवसापूर्वी प्रियाच्या आईला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे तिच्यावर रूग्णालयात वैद्यकीय इलाज चालू होता. पण अखेर या महामारीने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पुनियाने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू आणि यष्टीरक्षक वेदा कृष्णमूर्तीची आई आणि बहीण यांचे कोरोनाने काही दिवसांच्या अंतराने निधन झाले होते. इंग्लंड दौऱयासाठी वेदा कृष्णमूर्तीची संघात निवड करण्यात आलेली नाही.









