कुस्ती हेच जीवन महासंघाच्या आवाहनाला साद
औंध / प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात आर्थिकचक्र थांबले आहे. उदरनिर्वाह करण्याचे पालकासमोर मोठे आव्हान समोर असल्याने खुराकासाठी पैसे आणायचे कोठून अशा विवंचनेत असलेल्या पुणे जिल्ह्यातील महिला कुस्तीरांच्या मदतीला खा. अमोल कोल्हे धावून आले आहेत. त्यांनी तीन महिला कुस्तीरांच्या खुराकाची जबाबदारी स्वीकारली आहे.
कोरोनामुळे सर्वांची आर्थिकघडी विस्कटलेली आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा ताळमेळ घालताना लाल मातीतील हत्ती पोसायचे कसे असा प्रश्न आ वासून पालकांच्या पुढे उभा राहिला आहे.आखाडे बंद असले तरी शारीरिक क्षमता वाढवणारा व्यायाम सुरू आहे. मात्र खुराक कोठून आणायचा? या प्रश्नाने आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगिरांना ग्रासले आहे. कोरोनाविरुध्द आर्थिक आघाडीवर लढणाऱ्या पालकांना पैसे देणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील कोमल डोळे (आंतराष्ट्रीय मल्ल) सोनी कोळी, अक्षय वाळूज (राष्ट्रीय मल्ल) वरील मल्लांना दत्तक घेऊन त्यांच्या खुराकाचा प्रश्न खा. कोल्हे यांनी मार्गी लावला आहे.महिला कुस्तीगिरांच्या खुराकासाठी कुस्ती हेच जीवन पेजच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद घालत खा. कोल्हे यांनी खुराकासाठी आर्थिक मदत पालकांच्या खात्यावर जमा केली आहे. महिला कुस्तीगीरांचा सन्मान करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
महामारीच्या काळात माझा सराव आणि व्यायाम नियमितपणे सुरू आहे. मात्र आर्थिक अडचणीमुळे वडीलांच्या कडे खुराकासाठी पैसे मागू शकत नाही. ही समस्या खा. कोल्हे यांनी जाणून घेऊन मला केलेल्या आर्थिक मदतीमुळे मोठे बळ मिळाले आहे. पुढील काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करून त्यांनी केलेल्या मदतीचे चीज करुन दाखवेन असे मत आंतरराष्ट्रीय मल्ल कोमल. गोळेने तरुण. भारतशी. बोलताना व्यक्त केले.
कर्तव्य भावनेतून मदत
महिला कुस्तीगीरांच्या खुराकचा प्रश्न माझ्या समोर कुस्ती हेच जीवन यांनी मांडला होता. कस्तीक्षेत्रासाठी सदैव मदत करणारे आमचे नेते खा. शरद पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे. बिकट परस्थितीत झगडणाऱ्या महिला कुस्तीगीरांच्या लढाईला बळ देण्यासाठी कर्तव्य भावनेतून मदत केली आहे. यापुढेही मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन- खा. अमोल कोल्हे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








