प्रतिनिधी / बेळगाव
येथील म. ए. समितीच्या महिला आघाडीतर्फे माजी आमदार बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते चारवेळा आमदारपद भूषविलेले बी. आय. पाटील यांचे नुकतेच आजाराने निधन झाले. याबद्दल महिला आघाडीतर्फे बैठक बोलावून शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी, माजी आमदार यांच्या कारकीर्दीबद्दल बोलताना सीमावासियांचा आवाज म्हणून कर्नाटक विधानसभेत त्यांचा दबदबा होता. समितीचा आमदार कोण म्हटलं की बी. आय. पाटील हे नाव येते. सीमाभागाचे कोणतेही काम, प्रश्न बेधडकपणे मांडत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीदरम्यान बी. आय. पाटील यांचा दबदबा प्रत्यक्ष पाहिला होता. यामुळे त्यांच्या जाण्याने सीमाभागातील एक सच्चा नेता हरपल्याचे नमूद केले.
यावेळी महिला आघाडीच्या सेक्रेटरी सरिता पाटील यांनीदेखील श्ा़खद्धांजली वाहिली. यावेळी महिला आघाडीच्या सदस्या प्रिया कुडची, कांचन भातकांडे, मंजुश्री कोलेकर, रेखा गोजगेकर, अर्चना कावळे, अर्चना देसाई, आशा सुपली, भाग्यश्री जाधव, अनुपमा कोकणे, श्रद्धा मंडोळकर, राजश्री बांबुळकर, राजश्री बडमंजी व इतर महिला उपस्थित होत्या.