महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी पर्याय उपब्लध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आज महिलांसाठी विविध योजना दिल्या जातात, त्यामध्ये महिलांना सर्वाधिक आर्थिक समस्यांची निर्मिती होत आहेत. परंतु या समस्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारी आणि खासगी संस्था पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. या सर्वाचा उद्देश एकच आहे. तो म्हणजे महिलांना आर्थिक दृष्टय़ा सक्षम बनविण्यासाठी विविध मार्गांनी आर्थिक सवलती देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची माहिती खालील प्रमाणे.
बचत खाते : बँकांमध्ये महिलांच्यासाठी विशेष बचत खात्याची योजना उपलब्ध आहे. यामध्ये रिवॉर्ड आणि कॅशबॅकची सवलत दिली जाते. मुलांच्या शिक्षणासाठी महिला ज्युनिअर/किड खाते सुरु करु शकतात. यात कमीत कमी शिल्लक ठेवण्यावर सवलत दिली जाते.
कर्जावर कमी व्याजदर : ठराविक बँका महिलांसाठी गृहकर्जावरील व्याजदर कमी ठेवतात. हा दर जवळपास 0.05 टक्के इतका असतो. लांब कालावधीपर्यंतचे कर्ज असल्यास त्यामध्ये फरक निर्माण होतो. कार घेण्यासाठी कर्ज घेतानाही हा नियम लागू होतो.
उद्योग करण्यास चालना : महिलांना उद्योगात प्रगती करण्यासाठी सरकार विविध मार्गांनी चालना देते. यासाठी वेगवेगळय़ा योजना तयार करणे आणि त्यात महिलांचा सहभाग वाढविण्यास भर देणे हे काम सरकारी पातळीवर केले जाते. स्टॅड अप इंडियाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळत गेलीत. आणि उत्पादक क्षेत्रात 10 लाख ते 100 लाख इतक्या टप्प्यापर्यंत बँकां कर्ज देतात.
मालमत्ता खरेदीमधील लाभ : काही राज्य सरकरे महिलांच्या नावावर मालमत्ता स्टॅप टय़ुटी आणि ट्रान्सफर टय़ुटीत सवलत देत आहेत. यामध्ये मालमत्ता स्वस्तात पडते. दिल्लीमध्ये महिला या खरेदीसाठी स्टॅप टय़ूटी 4 टक्के आहे. तर पुरुषांसाठी हा टक्का 6 असल्याची माहिती आहे.









