मैत्री महिला अधिकारी क्लबचा उपक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
येथील मैत्री महिला अधिकारी क्लबच्यावतीने भाजी विपेत्या महिलांसाठी शौचालय उभारण्याच्या कामाला आर्थिक मदत देण्यात आली आहे. सोमवारी पालिका आयुक्तांकडे एक लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
कांबळीखूट, नरगुंदकर भावे चौक परिसरात भाजी विक्री करणाऱया महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय लक्षात घेऊन महिला अधिकारी क्लबने मनपाला शौचालय उभारण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.
क्लबच्या अध्यक्षा मैत्रेयी बिस्वास यांनी सोमवारी एक लाखांचा धनादेश पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला. यावेळी सुनंदा करलिंगण्णावर, महिला व बालकल्याण खात्याच्या विद्यावती बजंत्री, रेखा पाटील, आरती अंगडी, शोभा पाटील, लता आरकेरी आदी उपस्थित होत्या.









