अनोखे गाव, जीवनात केवळ एकाच कापतात केस
स्वतःचे केस काळेभोर आणि लांब असावेत असे प्रत्येकाची इच्छा असते. परंतु शहरांमधील वाढते प्रदूषण, खराब पाणी आणि चिंता यासारख्या काही कारणांमुळे लोकांचे केस अनेकदा खराब होतात. पुरुष असो किंवा महिला स्वतःच्या केसांबद्दल ते अधिक सजग असतात. पण जगात एक असे गाव आहे जेथील महिलांचे केस अत्यंत लांब आहेत. स्वतःच्या केसांमुळे या गावाने अनोखा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
दक्षिण चीनच्या गुइलिन शहरापासून 2 तासांच्या अंतरावर हुआंगलुओ गाव आहे. येथील महिलांचे केस खूपच लांब आहेत. याचमुळे या गावाचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. महिलांचे केस 5 फूट लांबीपर्यंत असतात, तर काही महिलांचे केस 6 फूट लांबीचे देखील आहेत. 2004 मध्ये एका महिलेच्या केसांची लांबी 7 फूट इतकी आढळून आली होती. येथील महिलांचे केस 1 किलो इतक्या वजनाचे असतात. याओ महिलांच्या नावाने प्रख्यात या महिला एका परंपरेमुळे स्वतःचे केस कापत नाहीत.
येथील महिला 17 किंवा 18 व्या वर्षी केवळ एकाच स्वतःचे केस कापतात. केस कापण्याचा एक सोहळा असतो, ज्यात गावातील अन्य लोकही सामील होता. त्यानंतर ती महिला कधीच केस कापत नाही. केसांची निगा ठेवणे अत्यंत अवघड असते. येथील लोकांनी महिलांच्या केसांसाठी विशेष प्रकारचे शॅम्पू देखील तयार केले आहेत.
केस वाढविण्याचे कारण
आपले केस शरीरावर वाढणारी गोष्ट नसून ती आपल्या आणि पूर्वजांमधील संपर्काचे एक माध्यम असल्याचे येथील महिलांचे मानणे आहे. याचमुळे त्या स्वतःचे केस कधीच न कापून स्वतःच्या पूर्वजांना आनंद देऊ पाहतात. अविवाहित महिला स्वतःच्या केसांना एका स्कार्फने बांधून ठेवतात. याओ महिलांचे नृत्य देखील प्रचंड प्रसिद्ध असून त्यांची संस्कृती पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येत असतात.









