वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढीलवर्षी भारतात होणाऱया महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण मंगळवारी येथे आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन आणि स्थानिक आयोजन समितीतर्फे करण्यात आले.
सदर स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत होणार असून मुंबई आणि पुणे येथे त्यातील सामने होणार आहेत. 2022 एएफसी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत 12 संघांचा समावेश आहे. गेल्या चार स्पर्धाच्या तुलनेत यावेळी या स्पर्धेत जादा चार संघांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी एका समारंभात एएफसी महिलांच्या आशियाई चषक इंडिया 2022 स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.









