ऑनलाईन टीम/तरुण भारत
कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये आणि शाळांमध्ये येणाऱ्या मुस्लीम मुली हिजाब घालत असल्यावरून मोठा वाद सध्या निर्माण झाला आहे. कॉलेजमध्ये हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेश बंदी आहे. यावर कर्नाटकसह देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता आता कर्नाटकमधलीच भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, हिजाबवरून कर्नाटकसह देशभरात वातावरण तापलेलं असतानाच आता कर्नाटकमधलीच भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “महाविद्यालये किंवा शाळांमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी गणवेश किंवा त्यांचं शरीर पूर्णपणे झाकलं जाईल असे कपडे घालायला हवेत. महिला परिधान करत असलेले काही कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हे योग्य नाही. कारण महिलांना आपल्या देशात आदर आहे, आपण महिलांना माता मानतो”, असं विधान रेणुकाचार्य यांनी केलं आहे.