बेळगाव / बेळगाव
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत असल्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर होत आहे. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात डिझेलच्या दरात 2 रूपये 77 पैसे वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यांपासून स्थिर असणारे डिझेलचे दर अचानक वाढल्यामुळे त्याचा दळणवळणावर परिणाम जाणवत आहे.
मागील महिन्यात डिझेलचा दर 67 रुपये 91 पैसे इतका होता. हा दर शनिवारी बेळगावमध्ये 70 रुपये 77 पैशांवर पोहचला होता. त्यामुळे डिझेलने 70 चा टप्पा गाठला आहे. दळणवळणासाठी वापरण्यात येणारी महत्त्वाची वाहने ही डिझेलवर चालत असल्यामुळे या दरवाढीचा परिणाम जाणवत आहे. दररोज डिझेलच्या दरात काही पैशांची वाढ होत आहे. डिझेलचा दर वाढल्याने सर्वच वस्तू व साहित्याचे दर वाढण्याची शक्मयता आहे. एकीकडे महागाईचा वाढता आलेख आणि दुसरीकडे झालेली डिझेल वाढ यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
बसप्रवासही महागण्याची शक्मयता
डिझेल वाढल्यामुळे दळणवळण महागण्याची चिन्हे आहेत. याचा थेट परिणाम बसप्रवासावर होणार आहे. बसप्रवास महागला तर त्याचा परिणाम नागरिकांवर होणार आहे. आधीच जानेवारीपासून रेल्वेने दरवाढ केलेली असतानाच आता बसप्रवास महागण्याची शक्यता आहे.
पेट्रोलचे दर स्थिर
डिसेंबर महिन्याचा विचार करता पेट्रोलच्या दरात मोठी तफावत झालेली नाही. महिन्याभरात केवळ 55 पैशांनी पेट्रोल महागले आहे. शनिवारी बेळगावमध्ये पेट्रोलचा दर 77 रुपये 95 पैशांइतका होता. इराक येथील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इंधनाचे वाढण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे









