प्रतिनिधी / वाकरे
वाकरे (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीने गावातील प्लॅस्टिक, काचा,टाकाऊ कचरा महिन्यातील शेवटच्या दोन दिवसात जमा करण्याचा विधायक निर्णय घेतला आहे.प्लॅस्टिक मुक्तीच्या या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत आहे.
ग्रामपंचायतीने गावांतील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या घरातील प्लॅस्टिक,फुटलेल्या काचा,खराब कपडे, घरातील इतर कचरा गावतळ्याच्या ठिकाणी,वाकरे ते कुडीत्रे रस्ता ,मैदान रोड ,वाकरे ते पोवारवाडी रोड व इतर सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो आपल्या घरामध्ये साठवून ठेवावा.ग्रामपंचायत महिन्यातील शेवटचे दोन दिवस ग्रामस्थांच्या दारात जाऊन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साह्याने कचरा घेऊन जाणार आहे.
या उपक्रमाला गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे,अन्यथा ग्रामपंचायतीकडून कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच सौ.शारदा पाटील,ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील,सर्व सदस्य यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








