वृत्तसंस्था/ चेन्नई
महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शीअल सर्व्हिसेस यांना डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीमध्ये 992 कोटी रुपये इतका एकत्रित निव्वळ नफा झाला असल्याची माहिती आहे.
तिमाहीच्या दरम्यान कंपनीने कर्ज वितरणामध्ये 28 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. कंपनीने ग्रामीण भाग आणि इतर शहरांमध्ये नव्या आणि जुन्या वाहनांच्या खरेदी करीता वाहन खरेदीदार ग्राहकांना कर्ज पुरवण्यावर अधिक भर दिला होता. या आधीच्या वर्षामध्ये समान तिमाहीत कंपनीने 223 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन केला होता.
उत्पन्नात वाढ
याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षात तिसऱया तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 2986 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याच्या आधीच्या वर्षात समान अवधीत त्यामध्ये काहीशी घट नोंदली गेली होती.









