नवी दिल्ली
महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची नवी स्पोर्टस् युटिलीटी व्हेईकल गटातील ‘थार’ ही गाडी नुकतीच बाजारात लाँच करण्यात आली. दमदार ‘थार’ची किंमत 9.8 लाख ते 13.75 लाख रुपये (एक्सशोरूम) इतकी असणार आहे. ही गाडी एएक्स व एलएक्स या दोन प्रकारात पेट्रोल आणि डिझेल इंधनावर आधारीत बाजारात उतरवली गेली आहे. पेट्रोल एएक्सची किंमत 9.8 लाख रुपये, 10.65 लाख आणि 11.9 लाख रुपये तर डिझेल इंधनावरील गाडीची किंमत अनुक्रमे 10.85 लाख, 12.10 लाख आणि 12.2 लाख रुपये राहणार आहे. पेट्रोल ऑटोमेटीक गाडीची किंमत 13.45 लाख रुपये राहणार आहे.









