वृत्तसंस्था/ बेंगळूर
महिंद्राच्या मालकीची क्लासिक लिजेंडस् ही नवी बाईक बाजारात उतरवली जाणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे. यायोगे वर्षाअखेरपर्यंत आपला व्यवसायातला वाटा दुप्पट करण्याचा इरादा कंपनीने राखला आहे.
दरम्यान पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या कामात बऱयाचअंशी यश आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोनाचा असर कमी झाल्याने आता विक्रीत वाढ करण्यासाठी कंपनी नेटाने प्रयत्न करणार आहे. या अनुषंगाने नवी क्लासिक लिजेंडस् ही बाईक आणण्याचा कंपनीने विचार केला आहे. जागतिक स्तरावर ही गाडी सादर होणार आहेच पण भारतीय बाजारात कधी उतरवली जाणार याबाबतचे स्पष्टीकरण कंपनीने दिलेले नाही.









