प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरामध्ये रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले.या अभियानांतर्गत एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा 99 वा रविवार होता. स्वच्छता मोहिम हॉकी स्टेडियम ते शेंडापार्क चौक, रंकाळा टावर परिसर, दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर परिसर, पंचगंगा नदी घाट व स्मशानभूमी परिसर, धैर्यप्रसाद हॉल ते सेवा रुग्णालय, रुईकर कॉलनी ते तावडे हॉटेल चौक परिसरात करण्यात आली.
वृक्षप्रेमी संस्थेकडून टाकाळा, माळी कॉलनी येथील महापालिकेच्या छत्रपती राजाराम उद्यानामध्ये तसेच आसपासच्या परिसरामध्ये प्लास्टिक व कचऱयाचा उठाव करण्याम आला. यावेळी लहान मुलांकडून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमाला बालचमू आणि स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेमध्ये वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, विद्या पाथरे, सविता साळोखे, साजिद शेख, ओंकार कांबळे, सचिन पवार, शैलेश पोवार, तात्या गोवा वाला, अथर्व गोडसे सहभागी झाले होते.
या स्वच्छता मोहिमेत 2 जेसीबी, 4 डंपर, 6 आरसी गाडया, 1 ट्रक्टर ट्रॉली, 3 औषध फवारणीचा वापर करण्यात आला. यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, आरोग्य निरिक्षक शुभांगी पोवार, सुशांत कावडे, शिवाजी शिंदे, मनोज लोट, नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.
आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, स्वच्छतादूत अमित देशपांडे, स्वरा फौडेंशनचे कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.