ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
जागतिक महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमेरिकेत कोरोनाबधितांचा आकडा लाखाच्या वर पोहचला आहे. त्यामुळे अमेरिकेत सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 18 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 1400 पेक्षा अधिक रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन ट्रिलियन डॉलरच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशनने जाहीर केलेल्या अहवालानुसार, दिवसाला 2300 जणांचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे.









