प्रतिनिधी/सांगली
सांगली शहर व परिसरात महाशिवरात्री उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे शहर परिसरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.
सांगलीतील केशवनाथ मंदिर, हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर , मौजे डिग्रज येथील बसवेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र सागरेश्वर , कुकटोळी येथील गिरलिंग देवस्थान आणि दंडोबा येथे महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होते. पण यंदा त्या सर्व मंदिरांच्या ठिकाणी भाविकांना मंदिरात दर्शन घ्यावे लागत होते. दरम्यान कोरोना च्या संकटामुळे मौजे डिग्रज येथे भरणारी बसवेश्वर यात्रा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Previous Articleकर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतील विषाणूचा पहिला रुग्ण
Next Article कर्नाटकात मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त








