कुरुंदवाड नगरपरिषद आणि पास रेस्क्यू फॉर्सच्या वतीने शिबिराचे आयोजन
कुरुंदवाड/प्रतिनिधी
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड घाट येथे कुरुंदवाड नगरपरिषद व पास रेस्क्यू फॉर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ मुख्याधिकारी निखिल जाधव अग्निशमन विभागाचे प्रमुख नितीन संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रशिक्षण शिबिरामध्ये एनएसएस, एनसीसीच्या 70 महाविद्यालयीन मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर दत्त रेस्क्यू फॉर्सचे जवान यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सर्वांना कुरुंदवाड नगरपरिषदेच्या वतीने सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना ओ आर एस, सैनी टायझर मास्क देण्यात आले आहे.
कुरुंदवाड पंचगंगा घाट नदीपात्रात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये लाईफ जॅकेट चा वापर कसा करणे, आपत्कालीन परिस्थितीत बोट हाताळणे, शोध मोहीम आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या दोन यांत्रिक बोटी, अस्का लाईट (2), सोक्टर (2), लाईफ रिंग(5), B A सेट (1), दोर(4), लाईफ जॅकेट (2), हेल्मेट (4), हातोडा(1), रबर हॅन्ड ग्लोज (20), गम बूट (20), हॅन्ड माईक (1), f f f अस्का सिलेंडर (1) समावेश करण्यात आला असून त्याचा पुरवठा करण्यात आला आहे दोन दिवस हे शिबीर चालणार असून शिबिराच्या पहिल्या दिवशी नगरपरिषद अग्निशमन विभाग पास रेस्क्यू फॉर्स तसेच एन एस एस व एनसीसीच्या 35 महाविद्यालयीन तरुणी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दत्त रेस्क्यू फॉर्स व पास रेस्क्यू फॉर्स व उर्वरित 35 महाविद्यालयीन तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव अग्निशमन विभागाचे नितीन संकपाळ शरद गायकवाड किशोर साळुंखे अमोल पाटील हेमंत सावंत राजेंद्र बाबर रमेश शेलार तसेच तुकाराम पवार श्री गायकवाड आदि पास रेस्क्यू फोर्सच्या जवानांसह एनएसएस व एनसीसी विद्यार्थिनी नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








