15 हून अधिक गावात कृषी ग्राहकांचा मेळावा, ग्राहकांच्या तक्रारींचे केले निरसन
प्रतिनिधी/कोल्हापूर
महावितरणने कृषीग्राहकांना कृषी धोरण 2020 चा लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी संवाद मेळाव्यांचा धडाका सुरू केला आहे. महावितरणच्या ग्रामीण 1 विभागीय कार्यालयांतर्गत कळे उपविभागातील 15 हून अधिक गावांमध्ये ग्राहक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शेकडो कृषीग्राहकांनी सहभाग नोंदा†वला. त्यामध्ये काही ग्राहकांनी वीज बिल दुरुस्तीसाठी अर्ज केला.
कळे उपविभागातील कळे, वेतवडे, गोगवे, मुसलमानवाडी, कोदवडे तसेच पडळ, यवलूज या गावात ग्रामीण-1 चे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी मेळावा घेऊन वीज ग्राहकांच्या वीज बिल विषयक तक्रारींचे निरसन करून वीज बिल दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. महावितरण आता थेट गावपातळीवर पोहचून कृषीग्राहकांशी संवाद साधला असून ज्या कृषीग्राहकांची वीज बिले मीटर रिडींगनुसार नाहीत, नादुरूस्त आहेत, त्यांनी मेळाव्यात सहभागी होऊन ती दुरुस्त करुन घ्यावीत. कृषी धोरण 2020 अंतर्गत वीज बिल माफीच्या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमु‹ व्हावे, असे असे आवाहन पाटील यांनी केले. कृषी ग्राहकांना वािविध योजनांची माहिती, मीटर रिडींग व वीज बिल संदेश मिळण्यासाठी आपले भ्रमणध्वनी अद्यावत करावेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी उपकार्यकारी अभियंता एस.पी.पाटणकर, सहाय्यक अभियंता साजने, सहाय्यक अभियंता चौगले, कनिष्ठ अभियंता नागरगोजे यांच्यासह संबंधित गावांतील कृषीग्राहक उपस्थित होते.
वसुलीमधील 33 टक्के रक्कम ग्रामपंचायतींसाठी
कृषीपंप वीज बिल वसुलीमधील 33 टक्के रक्कम महावितरणकडून संबंधित ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दिले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी मेळाव्यात सांगितले. यावेळी शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले.









