प्रतिनिधी / सातारा
मराठय़ांचे आरक्षण गमावून तुम्ही मराठा समाजाचा विश्वासघात तर केलातच शिवाय आरक्षणासाठी पहिले बलिदान दिलेले माझे वडील (कै) आमदार अण्णासाहेब पाटील आणि 42 मराठा तरुणांचीही हत्याही केलीत, अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी बुधवारी महाविकास आघाडी सरकारवर घणाघत केला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पाटील भावनिक झाले, त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला वारंवार सांगत होतो. मात्र अखेर भिती होती तेच झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले. खूप वाईट वाटते आहे. इतकी माणसे गेली. याप्रश्नी वर्षावर बसून अगोदर योग्य नियोजन करायला हवे होते. पण आता आरक्षण गेल्यावर आमचे नेते तिकडे आरक्षणावर चर्चा करायला गेलेत. आता काय डोंबलं होणार आहे का?. असा सवाल करत ते म्हणाले, अपेक्षित होतं योग्य युक्तिवाद केल्यानंतर मराठय़ांना न्याय मिळेल, परंतु दुर्भाग्य, खूप वाईट झालं. माझे वडील अण्णासाहेब पाटील यांनी 1982 मध्ये याच आरक्षणासाठी जीव दिला होता. मराठा क्रांती मोर्चानंतर 42 मराठा बांधवांनी बलिदान दिले. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात राज्य केले परंतु त्यांनी कधीही आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने भूमिका मांडली नाही. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला वारंवार सांगत होतो. मात्र अखेर भिती होती तेच झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले. सकाळपासून लोकं सांगत आहेत की शांत राहा, कोरोना आहे. झोपून राहा-आराम करा. दोन वर्षे कोरोना चालणार आहे. मग दोन वर्षे मुले शाळेत घालवू नका. एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षा देऊ नका, अरे कसले तुम्ही नेते आहात, टाळ वाजवा टाळ, अशी टीप्पणीही त्यांनी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









