मुंबई / ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजपासून 28 मार्चपर्यंत डेहराडूनच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे राज्यपाल भवनाकडून कोणालाही वेळ देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आजची भेट टळली आहे. राज्यपालांचा देहरादूनचा दौरा पूर्वनियोजित होता, ते 28 मार्चला मुंबईत परतणार आहेत, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यपाल डेहराडूनहून परत आल्यानंतर त्यांना भेट दिली जाण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी वापरण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती.
Previous Articleआरोग्यमंत्र्यांकडून राज्यात लॉकडाऊनचे संकेत
Next Article रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट








