मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यातील महाविकास आघाडीचं हे सरकार चुकून आलेलं आहे. ज्या पद्धतीने गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. तसं हे सरकार आहे, असं टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे लोक हे अनैसर्गिक युतीने एकत्र आलेले आहेत. विचारसरणी, विचार, गव्हर्नन्स नाही. केवळ सत्तेला चिकटलेले अशा प्रकारचे हे लोक आहे. ज्याप्रमाणे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात, त्याप्रमाणे सत्तेला चिकटलेले हे तीन पक्ष. त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाला नाही की ते ओरड होते. वाटा मिळाला की सगळे बंडोबा थंडोबा होतात.
पत्रकारांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका निभावली आहे. अनेकांनी पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून घोषित केलं आहे. आम्हीही तशी विनंती राज्य सरकारकडे केली होती. इतर राज्यांनी केलं आहे, पण आपल्या राज्यात त्यावर निर्णय झाला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.
मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. याबद्दल ते म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. ज्या प्रकारे अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होत आहेत की त्यांना गरिबाकडे पहायला फुरसत नाही. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय हे सरकार घेत नाही. आत्महत्या मोठ्य़ा प्रमाणात वाढत आहेत. शेतकऱ्याचा प्रश्न त्याच्या मृत्युनंतर तरी सोडवला पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








