प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्य अजिंक्मयपद क्रीडा स्पर्धेत येळ्ळूरच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थिनी तसेच महाराष्ट्र हायस्कूलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्नाटक राज्य ऍमॅच्युअर खो-खो फौंडेशनमार्फत ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विविध संघांनी भाग घेतला होता. पुरुष संघाने उपविजेतेपद मिळविले आहे. तर महिला संघाने अजिंक्मयपद मिळविले आहे.
महिला संघात समाज शिक्षण संस्था संचालित महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूरच्या रसिका प्रभाकर कंग्राळकर, प्रणाली रामचंद्र बिजगरकर, सानिका प्रभाकर चिठ्ठी, संजना बसवंत चिठ्ठी या खेळाडूंनी भाग घेऊन सूवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या.
सदर खेळाडूंना समाज शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे, इतर शिक्षक व कर्मचारीवर्गाचे प्रोत्साहन व क्रीडाशिक्षक वाय. सी. गोरल यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.









