प्रतिनिधी / सांगली
कडेगाव येथील जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत देशमुखे हे पश्चिम महाराष्ट्रातील एक आदरणीय व्यक्तीमत्व होते. जेष्ठांसह नव्याने लिहित्या हाताना बळ देणारे व्यक्तीमत्व होते. देशमुखे यांच्या आकस्मिक निधनाने साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नावे महाराष्ट्र सरकारने पुरस्कार ठेवावा अशी मागणी सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांनी केली. देशमुखे यांच्या श्रध्दांजली सभेत साहित्यीकांनी ही मागणी केली. देशमुखे यांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही सहकार कृषी व मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
सांगली जिल्हा साहित्य चळवळीच्यावतीने जेष्ठ कवी चंद्रकांत देशमुखे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी वॉन्लेसवाडी येथे ऑनलाईन शोकसभा पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व साहित्यिक संस्था कार्यकर्ते कवी लेखक सहभागी होते.
या शोकसभेत सहकार कृषी व मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही यावेळी राज्य सरकारच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले चंद्रकांत देशमुखे यानी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी योगदान दिले आहे. त्यांनी साहित्यि आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेले काम साहित्यिकाना प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
यानंतर, चतुरंगचे महेश कराडकर, कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने प्रा. भिमराव धुळूबुळू, प्रतिभा जगदाळे, हिम्मत पाटील, लवकुमार मुळे, प्रा. अनिलकुमार पाटील, सुभाष कवडे, समाधान पोरे, गौतम कांबळे, शांतीनाथ मांगले, संदिप नाझरे, दत्तात्रय सपकाळ, तानाजी जाधव, सुनीता बोर्डे, अरुण कांबळे बनपुरीकर आदी साहित्यिकानी देशमुखे यांच्या आठवणीना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
अभिजीत पाटील नामदेव भोसले दयासागर बन्ने, नाना हलवाई, भिमराव कांबळे यांनी या शोकसभेचे आयोजन केले होते.
Previous Article20 वर्षांचे झाले ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र
Next Article कोल्हापूर : 1586 नवे कोरोना रुग्ण, तर 33 मृत्यू








