ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून नवरात्रौत्सव, दुर्गा पुजा आणि दसऱ्यासाठी आज नियमावली जाहीर करण्यात आली.
- यंदा गरबा आणि दांडियावर बंदी
नव्या नियमावलीमुसार सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा 2 फूट इतकी करण्यात आली आहे. शिवाय यंदाच्या नवरात्रौत्सवात दांडिया किंवा गरब्याच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोनासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
त्यासोबतच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गर्दी न करता केले जावे, मंडपात सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच दसऱ्याच्या दिवशी मात्र, रावण दहन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. सर्व कार्यक्रम पार पाडताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.