मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते गमे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर पेजवरून याची माहिती देण्यात आली आहे.
विदर्भातील ओबीसी चळवळीमधील कार्यकर्ते व महाज्योतीचे संचालक म्हणून प्रा. दिवाकर गमे यांची ओळख आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष बळकटीकरणासाठी प्रा. दिवाकर गमे यांचे सहकार्य राहील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणिस शिवाजीराव गर्जे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सरचिटणीस राज राजापूरकर, युवक अध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, निळकंठ पिसे, विनय डहाके उपस्थित होते.
यासोबतच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर शहर जिल्हाध्यक्ष पदी दुणेश्र्वर सूर्यभान पेठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पेठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच विदर्भातील तेली समाजाचे नेते निळकंठराव पिसे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.








