ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी रात्री मुख्य सचिवांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य सचिवांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात एक जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने मुख्य सचिवांनी आपली ही चाचणी केली असता संजय कुमार यांचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आला आहे. मात्र, सचिव कार्यालयात इतर कोणीही कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांमध्ये मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात विविध नियोजनासंदर्भात अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क आला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, संजय कुमार हे सध्या स्वतः च्या घरीच क्वारंटाइन असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.








