ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. यासोबतच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. मागील 24 तासात राज्यात 8 हजार 602 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 6 हजार 067 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 170 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 44 हजार 801 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,46,09,276 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,81,247 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,80,771 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,301 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 06 हजार 764 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : सध्या 6,989 रुग्णांवर उपचार सुरू

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 635 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 582 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,29,250 वर पोहचली असून त्यातील 7,04,259 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,654 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 928 दिवस इतका आहे.









