आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कागल / प्रतिनिधी
उत्तरप्रदेश येथील लखीमपुर येथे शेतकरी आंदोलनात आंदोलकांच्या अंगावर गाडी घातल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, ईगल प्रभावळकर, शिवाजी कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, सौरभ पाटील, आनंदा पसारे, अमित पिष्टे, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.