कराड/ प्रतिनिधी
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र दिनी येथील नगरपालिकेच्या वतीने अनोखे अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र दिर्नानिमित्त नगरपालिकेच्यावतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अखंड महाराष्ट्राचा नकाशा पणत्यांच्या साहाय्याने तयार केला. तसेच संपूर्ण समाधीस्थळ पणत्यांनी उजळवण्यात आले होते.
मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता ए. आर. पवार तसेच नगरपालिकेतील कर्मचारी उपस्थित होते. या नकाशामुळे प्रीतिसंगम परिसर उजळून गेला होता. नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, नितीन भोसले तसेच नागरिकांच्या सहाय्याने हा नकाशा करण्यात आला. यावेळी
यावेळी ए. आर. पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राचा कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून महाराष्ट्रात आणला. त्यांची आठवण म्हणून महाराष्ट्रदिन स्व. चव्हाण यांच्या समाधीस्थळावर पणत्यांनी उजळून साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त दोन दिवस समाधीस्थळाशेजारी मेणबत्त्यांच्या रोषणाईमध्ये दोन दिवस रात्री 10 वाजता नकाशा तयार करण्यात आला होता. रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नगरपालिकेच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.








