ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,611 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 38 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 60 हजार 186 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 489 एवढा आहे.

कालच्या एका दिवसात 1,773 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 74 हजार 248 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 33 हजार 269 रुग्ण उपचार घेत आहेत.
- मुंबईत 529 नवे रुग्ण

मुंबईत कालच्या दिवसात 529 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 542 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,13,431 वर पोहचली आहे. तर 2,95,886 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,413 इतकी आहे. सद्य स्थितीत 5 हजार 276 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.








