- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.48 %
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,984 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 125 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 01 हजार 365 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 42 हजार 240 एवढा आहे. सोमवारी दिवसभरात 15,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

राज्यात आतापर्यंत 13 लाख 84 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 73 हजार 759 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 86.48 % आहे. तर मृत्यू दर 2.64 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 81 लाख 85 हजार 778 नमुन्यांपैकी 16 लाख 01 हजार 365 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24 लाख 14 हजार 577 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 23 हजार 285 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.








