ऑनलाइन टीम / पुणे :
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाला रफिक शेखला चितपट करून सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाजी मारली माती विभागाची अंतिम फेरी गाठली आहे.
गतवर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत बाला रफिक शेख हा विजयी ठरला होता. यावर्षीही त्याचं वर्चस्व या स्पर्धेवर असेल असं वाटत होतं अशातच सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला आस्मान दाखवले.
अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला चितपट केलं आहे. बाला रफिक शेख हरल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे.
बालाला चितपट करणारा माऊली जमदाडे हा मूळचा सोलापूरचा असून तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करतो.
दरम्यान, बाला रफिक पाठोपाठ गतउपविजेता आणि 2018 च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता अभिजीत कटकेचंसुद्धा महाराष्ट्र केसरीमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे अभिजित कटके आणि बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल स्पर्धेबाहेर गेले आहेत.









