ओटवणे/ प्रतिनिधी-
तेरेखोल नदीच्या महापुराचे पाणी शिरूर घर जमीनदोस्त झालेल्या ओटवणे कापईवाडी येथील विठोबा न्हानु वरेकर यांना महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने १३३०० रूपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली.
गवळी समाजातील विठोबा वरेकर यांचे घर तेरेखोल नदीच्या पुरात जमीनदोस्त झाल्यामुळे महाराष्ट्रीय चॅरिटी ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्त मदतनिधीसाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गवळी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी विठोबा वरेकर यांनी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, सचिव रामदास बुराण, खजिनदार विश्राम केळुसकर, कार्यकारिणी सदस्य प्रशांत बुराण, रामचंद्र भालेकर, सुरेश वरेकर आदी उपस्थित होते.