मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्राला महिन्यापोटी ३ लाख डोस उपलब्ध झाले तर महाराष्ट्रातील लसीकरण येत्या दोन महिन्यात पूर्ण करणे शक्य होईल. म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३ कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देण्याचा ठराव मांडला. महाराष्ट्राची महिन्यापोटी ३ कोटी डोस देण्याची तयारी आहे. त्यामुळेच विधानसभेत संमत झालेला हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग असून आतापर्यंत राज्यात २१ डेल्टा प्लस, म्यूकरमायकोसिस ५५०० केसेस आढळल्या आहेत. देशाच्या स्थूल उत्पन्नात राज्याचा वाटा आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाच्या केसेस, मृत्यूदर कमी व्हायला हवा असे टोपे यांनी सांगितले. त्यासाठीच आपल्याला लसीकरण करणे काळाची गरज आहे म्हणूनच ठराव मांडल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
येत्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या माध्यमातूनच तिसऱ्या लाटेचा धोका टाळता येऊ शकतो. तिसऱ्या लाटेची दाहकता, परिणामकता कमी करायची असेल तर याचेही उत्तर लसीकरण आहे. राज्याला ३ कोटी लस मिळावी, सार्वभौम महाराष्ट्राच्या सभागृहातून केंद्राला करण्याचा ठराव त्यांनी सभागृहात मांडला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








