सईद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा -विदर्भची राजस्थानविरुद्ध बाद फेरीतील लढत
वृत्तसंस्था/ बाली
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू तृतीय मानांकित पीव्ही सिंधू तसेच लक्ष्य सेन यांनी येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत विजयी सलामी देत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
सलग दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारी तसेच विद्यमान विश्वविजेती पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात थायलंडच्या के. सुपानिडाचा 43 मिनिटांच्या कालावधीत 21-15, 2ö19 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. सिंधूचा दुसऱया फेरीतील सामना स्पेनच्या क्लेरा अझुरमेंदीविरुद्ध होणार आहे.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या 20 वर्षीय लक्ष्य सेनने जपानच्या दहाव्या मानांकित केंटा सुनेयामाचा 21-17, 18-21, 21-17 अशा गेम्स्मध्ये 70 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. दुसऱया फेरीत लक्ष्य सेनची गाठ जपानच्या टॉप सीडेड आणि दोनवेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱया केंटो मोमोटाशी होणार आहे.
पुरूषांच्या दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा पहिल्या फेरीतील सामना मलेशियाच्या सिन आणि तेओ इ यांच्याविरुद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचा पहिल्या फेरी फेरीतील सामना डेन्मार्कच्या बोजे आणि पोलसेनविरुद्ध होणार आहे.









