चालू आर्थिक वर्षातली आकडेवारी, कर्नाटक अव्वल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 48 हजार 633 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. एकंदर आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या कालावधीत कर्नाटकात सर्वाधिक म्हणजेच 1.02 लाख कोटींची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे.
वर्षागोदर 1 लाख 19 हजार 734 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. महाराष्ट्र विधानसभेत या संदर्भातील माहिती नुकतीच देण्यात आली. एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2021 पर्यंतच्या काळामध्ये महाराष्ट्राला थेट विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून 9 लाख 59 हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सदरच्या कालावधीतील गुंतवणूक देशातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून पाहता 28 टक्के इतकी गणली गेली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मात्र थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात अपेक्षेइतकी झाली नाही.
कर्नाटक आघाडीवर
चालू आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक 1.02 लाख कोटी रुपये इतकी थेट विदेशी गुंतवणूक कर्नाटकामध्ये झाली आहे. यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे दिसले आहे.









