ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात बुधवारी 2190 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर पोहचली आहे. तर कालच्या दिवसात 105 रुग्णांचा मृत्यू झाला असून आता पर्यंत 1897 जणांनी जीव गमावला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बुधवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 964 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 17 हजार 918 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 37 हजार 125 रुग्ण उपचार घेत आहेत.
काल दिवसभरात झालेल्या 105 कोरोना मृत्यूमध्ये मुंबईत 32, ठाणे 16, पुणे 9, जळगाव 10, नवी मुंबई 7, रायगड 7, औरंगाबाद 4, अकोला 6, नाशिक 3, सोलापूर 3, सातारा 2, अहमदनगर 1, नागपूर 1, नंदुरबार 1, पनवेल 1 तर वसई विरार मध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तसेच राज्यातील एका व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 72 पुरुष आणि 33 महिला रुग्ण आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 4 लाख 3 हजार 976 नमुन्यांपैकी 56 हजार 948 जण पॉझिटिव आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.5 टक्के एवढे आहे. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 761 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.









