मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा दिल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे. या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक मोठ वक्तव्य केले आहे ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नाना पटोले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे. तुम्हाला त्याचा निकाल भविष्यात पहायला मिळणार. आम्ही जी दिशा घेऊन काम करतोय, त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल हे २०२४ मध्ये आपल्याला पहायला मिळेल. स्वबळाचा निर्णय हा पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. शरद पवार यांनी काल जे वक्तव्य केलं आहे, २०१४ मध्ये पण त्यांनी असाच निर्णय घेतला होता. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता. निवडणुका कशा लढायच्या ही आमच्या पक्षाची रनणीती आहे, असं नाना पटोले म्हणाले.
२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बनणार म्हणजे बनणारच. कारण, आज देशामध्ये भाजपला पर्याय फक्त काँग्रेस आहे. भाजपने केंद्रामध्ये बसून देश विकायला काढला आहे, देश विकला. लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. काही लोकांना तर असं वाटतं आहे की कोरोना परवडला पण ही महागाई परवडत नाही. असं लोक आता बोलू लागले आहेत. भाजपाने कोरोना आणि महागाई या दोन्हीचा संगम करुन आता देशातल्या लोकांचं जगणं मुश्किल केलं असल्याचे नाना पटोले म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








